Wednesday 22 July 2020

सामाजिक बांधिलकी

कुणीतरी बांधील की बांधीलकी 
म्हणतात परि कुणी ती बांधावी शाळा ?
देशास पुढती पुढती नेऊ चला 
सेवावृत्तीवीरांना करुनिया ते गोळा.. 

उठा जागे व्हा आणि श्रमदान करण्या 
होऊ आपण अवघे समाजसेवक तयार.. 
श्रमाचे महत्व छान पटावे सकळा
धरेवर करु कुदळ घेवोनिया प्रहार... 

मग ते टोपले भरोनिया मृत्तिका 
टाकू जवळीच एखादा खड्डा बघोनिया
कष्टजन्य असा घाम अंगा येता पहा
मन जाईल आनंदाने चिंब ते होऊनिया... 

कसे तुम्हा भावते सेवाशून्य ते जगणे
श्रम करण्या आलस्यस्वभाव येई आडवा
किमान एक खड्डा खणणेचा संकल्प 
मनी तो सेवावृत्तीवीरांनो जागवा. 
-
शांता मधुकर औंधकर 

No comments:

Post a Comment

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते.  सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या.. पण फक्त एकवेळच.  नंतर त्यांची हिंमत झाली नाही. या...