Sunday 26 July 2020

साहित्य शिरोमणी आणि मुका प्राणी



साशि सूरज जाधवराव यांच्या प्रतिभेची उंची माझ्या सारख्या साहित्य क्षेत्राची कसलीही माहिती नसणार्‍या वाचकाने मांडणे, म्हणजे सूर्याला उदबत्ती दाखवण्यासारखे आहे. 

त्यांचे नवे पुस्तक आले आहे हे एका मराठी सोशल साईटवर कळले. त्यात मुका हा शब्द आकर्षक वाटला. तिथे मुके हा शब्द वापरला असता तर अजून जास्त व्यापक असे शीर्षक झाले असते. पण मुका हे पण काही कमी नाही. 

आपल्या गाडीला किक मारुन साहित्य शिरोमणी जंगलात भल्या पहाटे निघतात. तर ऐन जंगलात त्यांची गाडी बंद पडते. मग पैसे नसल्याने ते कसे गोंधळून गेले हे वाचण्यासाठी तरी ते पुस्तक घ्यायला हवे. 

साहित्य शिरोमणी सूरज जाधवराव (साशिसुजा)
सुदैवाने कृतीशील लेखन करणारे लेखक आहेत. नाही तर जंगलाच्या चित्राचा पडदा मागे लाऊन खोटे खोटे वाघसिंह सोबत घेऊन फोटो काढणारे आजकाल कमी नाहीत. 

 
साशि सूरज जाधवराव यांची एक आठवण त्यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. 

 

साशिसुजा एकदा रांगत रांगत गेले आणि त्यांनी वाघाला उचलून आदळले. नंतर त्यांनी त्या वाघाचे शेपुट पिरगाळून पुन्हा आदळलं. आता मात्र दुकानदार पुढे झाला आणि त्याने तो वाघ साशिसुजा यांचे हातातून घेऊन कपाटात ठेवून दिला. 

पुस्तक तसे वाचनीय झाले आहे. 

कठीण शब्दाचे अर्थ - 
साशि - साहित्य शिरोमणी 
वाघ - जंगलातील एक प्राणी
मुका - बोलू न शकणारा ( तुम्हाला काय वाटले ?) 

शांता मधुकर औंधकर 



Thursday 23 July 2020

संसार रथाची चाके

लग्न होऊन औंधकरांकडे आले तेव्हा मामंजी 
(निनूच्या पप्पांचे वडील) म्हणाले होते, 
आजपासून तुम्ही दोघे संसाराच्या गाड्याची दोन चाके झालात. 

पण ह्या जुन्या समजुती आहेत. 

त्यामुळे खूप लोक मागे राहिले. 

नवे नवे आपण स्वीकारणार नाही तर पुढे जाणार कसे ? 

हा फोटो हराडकर वहिनी फिरायला परदेशी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी घेतला होता. 

त्या म्हणाल्या, देश असो किंवा मग मेला तो आपला संसार, हा फोटो बघून आपण पुढे जायचे शिकलो पाहिजे. 

- शांता मधुकर औंधकर 





निसर्गाकडे चला




आम्ही दोघेही यात्रा किंवा देवदेव करत नाही. 
परंतु सासूबाई फार यात्रा करायच्या. 
सासरेबुवांचा स्वभाव आस्तिक होता.

पण निनूचे बाबा आणि मी... 
आहे बाई एक कोणतीतरी शक्ती, असे मानतो.

आम्ही पण फिरलो. 
पण निसर्ग बघण्यासाठी फक्त. 

निनूच्या बाबांचा एकसष्टावा वाढदिवस आम्ही निसर्ग बघत घालवला होता.

एकदा ते घाबरले. 
मी दिसले नाही ना... 
म्हणून. 
मग ते मला हाका मारत शोधू लागले. 

मग मी त्यांना बोलावलं आणि म्हणाले, 
हे बघा या झाडाजवळ मी निसर्ग बघते आहे. 
वयाच्या एकसष्टाव्या वर्षी त्यांची निसर्ग बघण्याची मेली ती हौस.. इश्श.. 

मला हिंडणे आवडते. 
ते गेल्यानंतर देखील मी हिंडणे चालू ठेवले आहे. 
निसर्ग आपण पाहिला नाही तर निसर्गाला काय वाटेल? 

सासूबाई फारच आस्तिक होत्या. 
कमी शिकलेल्या होत्या आणि देवदर्शन घेत हिंडायच्या. 

परंतु आम्ही जास्त शिकलो. 
म्हणून आम्हाला निसर्ग बघत हिंडणे खूप आवडते. 

- शांता मधुकर औंधकर 



Wednesday 22 July 2020

स्त्रीचे आत्मभान

कधी विचार केलाय, चित्रपटांनी भारताला किती झपाट्याने विसावे शतक ओलांडून एकविसाव्या शतकात आणलंय ? 

पुप्रसं च्या जोखडातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या स्त्री ला चित्रपट सृष्टीने नवी अस्मिता दिली. 
कठीण शब्द व अर्थ 

पुप्रसं - पुरुषप्रधान संस्कृती 
झपाटय़ाने - वेगाने 

-शांता मधुकर औंधकर 





सामाजिक बांधिलकी

कुणीतरी बांधील की बांधीलकी 
म्हणतात परि कुणी ती बांधावी शाळा ?
देशास पुढती पुढती नेऊ चला 
सेवावृत्तीवीरांना करुनिया ते गोळा.. 

उठा जागे व्हा आणि श्रमदान करण्या 
होऊ आपण अवघे समाजसेवक तयार.. 
श्रमाचे महत्व छान पटावे सकळा
धरेवर करु कुदळ घेवोनिया प्रहार... 

मग ते टोपले भरोनिया मृत्तिका 
टाकू जवळीच एखादा खड्डा बघोनिया
कष्टजन्य असा घाम अंगा येता पहा
मन जाईल आनंदाने चिंब ते होऊनिया... 

कसे तुम्हा भावते सेवाशून्य ते जगणे
श्रम करण्या आलस्यस्वभाव येई आडवा
किमान एक खड्डा खणणेचा संकल्प 
मनी तो सेवावृत्तीवीरांनो जागवा. 
-
शांता मधुकर औंधकर 

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते.  सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या.. पण फक्त एकवेळच.  नंतर त्यांची हिंमत झाली नाही. या...