Sunday 26 July 2020

साहित्य शिरोमणी आणि मुका प्राणी



साशि सूरज जाधवराव यांच्या प्रतिभेची उंची माझ्या सारख्या साहित्य क्षेत्राची कसलीही माहिती नसणार्‍या वाचकाने मांडणे, म्हणजे सूर्याला उदबत्ती दाखवण्यासारखे आहे. 

त्यांचे नवे पुस्तक आले आहे हे एका मराठी सोशल साईटवर कळले. त्यात मुका हा शब्द आकर्षक वाटला. तिथे मुके हा शब्द वापरला असता तर अजून जास्त व्यापक असे शीर्षक झाले असते. पण मुका हे पण काही कमी नाही. 

आपल्या गाडीला किक मारुन साहित्य शिरोमणी जंगलात भल्या पहाटे निघतात. तर ऐन जंगलात त्यांची गाडी बंद पडते. मग पैसे नसल्याने ते कसे गोंधळून गेले हे वाचण्यासाठी तरी ते पुस्तक घ्यायला हवे. 

साहित्य शिरोमणी सूरज जाधवराव (साशिसुजा)
सुदैवाने कृतीशील लेखन करणारे लेखक आहेत. नाही तर जंगलाच्या चित्राचा पडदा मागे लाऊन खोटे खोटे वाघसिंह सोबत घेऊन फोटो काढणारे आजकाल कमी नाहीत. 

 
साशि सूरज जाधवराव यांची एक आठवण त्यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. 

 

साशिसुजा एकदा रांगत रांगत गेले आणि त्यांनी वाघाला उचलून आदळले. नंतर त्यांनी त्या वाघाचे शेपुट पिरगाळून पुन्हा आदळलं. आता मात्र दुकानदार पुढे झाला आणि त्याने तो वाघ साशिसुजा यांचे हातातून घेऊन कपाटात ठेवून दिला. 

पुस्तक तसे वाचनीय झाले आहे. 

कठीण शब्दाचे अर्थ - 
साशि - साहित्य शिरोमणी 
वाघ - जंगलातील एक प्राणी
मुका - बोलू न शकणारा ( तुम्हाला काय वाटले ?) 

शांता मधुकर औंधकर 



No comments:

Post a Comment

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते.  सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या.. पण फक्त एकवेळच.  नंतर त्यांची हिंमत झाली नाही. या...